Isaiah 19:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहुद्यांच्या भूमीला मिसरमधील सर्व लोक घाबरतील. मिसरमधील प्रत्येकजण यहुदाचे नाव ऐकताच भयभीत होईल. असे होण्याचे कारण हेच की सर्वशक्तिमान परमेश्वराने मिसरमध्ये भयानक गोष्टी घडून आणण्याची योजना आखली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूदाची भूमी मिसर देशाला भीतिप्रद होईल; तिचे मिसर देशाजवळ कोणी नाव काढल्यास तो भयग्रस्त होईल; सेनाधीश परमेश्वराने जो संकल्प त्याच्याविषयी योजला आहे त्यामुळे असे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाची भूमी मिसराला लटपटविण्याचे कारण होईल. जेव्हा कोणीएक तिची आठवण त्यास करून देईल, ते घाबरतील, परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल.