Isaiah 19:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या वेळेला मिसरमधील पाच शहंरातील लोक युहद्यांची कनान भाषा बोलतील. त्या पाच शहरांपैकी एका शहराचे नाव “ईर-हरेस” असेल. ह्या शहरांत राहणारे लोक सर्व शक्तिमान परमेश्वरला अनुसरण्याची शपथ वाहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी मिसर देशाची पाच नगरे कनान देशाची भाषा बोलतील; ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील; त्यांपैकी एकाला ईर-हरेस (विनाशनगर) म्हणतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर म्हटले जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी मिसर देशामध्ये पाच नगरे कनानाची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील. त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील.