Isaiah 19:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सामर्थ्यशाली कृत्यांची मिसरमधील ही निशाणी आणि पुरावा असेल. केव्हाही लोकांनी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला की परमेश्वर मदत पाठवील. लोकांचे रक्षण व बचाव करण्यास देव एका माणसाला पाठवील हा माणूस अत्याचार करणाऱ्यापासून लोकांना सोडवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणार्‍यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करतील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांना मुक्त करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. कारण ते जुलूमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षणकर्ता पाठवील, आणि तो त्यांना सोडवील.