Isaiah 19:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळेला मिसरवासीयांना परमेश्वराची खरी ओळख होईल. ते देवावर प्रेम करतील. ते देवाची उपासना करतील आणि बळी अर्पण करतील. ते परमेश्वराला नवस बोलतील आणि ते फेडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी परमेश्वर मिसर्‍यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस ओळख करून देईल आणि मिसरी परमेश्वरास ओळखतील. ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील. ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील.