Isaiah 2:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे लोक, म्हणजे याकोबाचे घराणे, ह्यांचा तू त्याग केला आहेस; कारण ते पूर्वेकडील रीतिभातींत मग्न झाले आहेत, पलिष्ट्यांसारखे मांत्रिक बनले आहेत आणि परदेशीयांच्या हातात हात घालत आहेत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा तुमच्या लोकांचा त्याग केला आहे, ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत; पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तू तुझ्या लोकांचा म्हणजे याकोबाच्या घराण्याचा त्याग केला आहेस, कारण ते पूर्वेकडील लोकांच्या चालीरितीने भरले आहेत आणि ते पलिष्ट्याप्रमाणे शकुन पाहणारे आहेत, व ते परदेशी लोकांच्या पुत्रांबरोबर हातमिळवणी करतात.