Isaiah 21:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
0यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे माझ्या झोडलेल्या आणि खळ्यातल्या धान्या, इस्राएलाचा देव, सेनाधीश परमेश्वर, ह्याच्याकडून जे मी ऐकले ते मी तुम्हांला कळवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.