Isaiah 21:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते प्रवासी, त्यांना ठार मारायला उठलेल्या तलवारीपासून व युध्द करायला सज्ज असलेल्या धनुष्यांपासून दूर पळत होते. ते घनघोर युध्दापासून दूर पळत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.