Isaiah 21:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दु:खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.