Isaiah 22:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण पाहा! आता लोक आनंदात आहेत. ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ते म्हणत आहेत, गुरे, मेंढ्या मारा. आपण उत्सव साजरा करू. आपण जेवण करू, मद्यपान करू कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.