Isaiah 22:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजप्रासादातील त्या नोकराला जाब विचार, ‘येथे काय करीत आहेस? तुझ्या कुटुंबातील कोणाचे येथे दफन केले आहे का? तू येथे थडगे का खणीत आहेस?” यशया म्हणाला, “हा माणूस पाहा, हा स्वत:चे थडगे महत्वाच्या जागी खणत आहे. खडक फोडून तो स्वत:चे थडगे खणत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येथे तुझे काय आहे? येथे तुझे कोण आहे? तू आपल्यासाठी थडगे खोदवले आहेस; उच्च स्थळी थडगे खोदवले आहेस; खडक कोरून तू आपणासाठी जागा केली आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची उंचीवर तुमची कबर कोरण्याची, आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस.