Isaiah 22:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी हे शहर फार गजबजलेले होते. येथे गलबलाट होता आणि शहर सुखी होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. तुझे लोक मारले गेले पण तलवारीच्या वाराने नव्हे. तुझे लोक मेले हे खरे, पण लढताना नव्हे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे गोंगाटाने भरलेल्या, गजबजलेल्या शहरा, उत्सवशब्द करणार्या नगरा, तुझ्यातील वध पावलेले तलवारीने वधले नाहीत, युद्धात मारले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे गोंधळाने भरलेल्या नगरा, हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा, तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते, ते युद्धातही मरण पावले नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत.