Isaiah 22:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आता, कठीण पृष्ठभागावर ठोकून बसविलेला खिळा (शेबना) त्या वेळी कमकुवत होऊन तुटून पडेल. तो खिळा जमिनीवर तुटून पडल्याने त्याला अडकविलेल्या वस्तूंचा नाश होईल. नंतर मी दृष्टांन्तात सांगितल्याप्रमाणे सर्व होईल.” (परमेश्वराने सांगितले असल्यामुळे ह्या गोष्टी घडतील)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे.