Isaiah 23:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तिने मिळविलेला पैसा ती जवळ ठेवणार नाही. व्यापारात तिला झालेला फायदा परमेश्वरासाठी राखून ठेवला जाईल. तो फायदा, ती परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना देईल. मग परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना पोटभर अन्न मिळेल. ते चांगले कपडे घालतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीसुद्धा तिचा नफा आणि तिचे उत्पन्न याहवेहसाठी वेगळे ठेवले जाईल; ते साठविले जाणार नाही किंवा त्याचा गुप्तसंचय केला जाणार नाही. तिचा फायदा याहवेहसमोर जे राहतात त्यांना भरपूर अन्न आणि उत्तम कपडे मिळावे यासाठी त्यांच्याकडे जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या व्यापाराचा माल व त्याचे वतन परमेश्वरास पवित्र होईल, ते वतन साठवले जाणार नाही व राखून ठेवले जाणार नाही, तर जे परेश्वरासमोर राहतात त्यांनी भरपूर खावे व टिकाऊ वस्त्र घालावे म्हणून त्यांच्यासाठी त्याचा व्यापाऱ्याचा माल येईल.