Isaiah 23:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सीदोन, तू खरे म्हणजे जास्त खिन्न व्हायला पाहिजेस. का? कारण आता समुद्र व समुद्रातील किल्ला म्हणजे सोर म्हणतात, “मला मुले नाहीत. मी प्रसूतिवेदना अनुभवल्या नाहीत. मी मुलांना जन्म दिला नाही. मी मुलांना वाढवले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे: “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीदोन आणि समुद्रातील किल्ल्यांनो, लज्जित व्हा, कारण समुद्र म्हणाला: “मला कधीही बाळंतपणाच्या वेदना झाल्या नाहीत आणि मी कधीही प्रसवलो नाही; मी कधीही मुलांचे संगोपन केले नाही किंवा मुलींचा सांभाळ केला नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो, “मी प्रसुती वेदना दिल्या नाहीत व मी प्रसवलेहि नाही, मी तरूण पुरूष वाढवले नाहीत व तरूणींना लहाण्याच्या मोठ्या केल्या नाहीत.”