Isaiah 24:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणार्‍याची तशी विकत देणार्‍याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते प्रत्येकासाठी समान असेल, जसे लोकांसाठी तसेच याजकासाठी जसे सेवकासाठी तसेच त्याच्या मालकासाठी जसे सेविकेसाठी तसेच तिच्या मालकिणीसाठी, जसे खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विकत घेणाऱ्यांसाठी, जसे उसने देणाऱ्यासाठी तसेच उसने घेणाऱ्यासाठी, जसे कर्जदारांसाठी तसेच कर्जदात्यांसाठी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.