Isaiah 24:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे. वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे; कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे, ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल, तिचा अपराध तिच्यावर भारी होईल तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही.