Isaiah 24:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चंद्राची त्रेधा उडेल, सूर्य लज्जित होईल; कारण सर्वसमर्थ याहवेह वैभवाने सीयोन पर्वतावर आणि यरुशलेममध्ये, आणि आपल्या वडीलजनांसमोर—गौरवाने राज्य करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील.