Isaiah 25:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर असल्याने मवाबचा पराभव होईल. परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परमेश्वराचा हात यरूशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी सियोन पर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आर्शीवाद सदैव यरूशलेमेतील लोकांबरोबर राहतील, पण मवाब गवताप्रमाणे पायाखाली तुडवील जाईल व फेकल्या जाईल.