Isaiah 25:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पोहणाऱ्या माणसाच्या हाताप्रमाणे परमेश्वर स्वत:चा हात लांब करील आणि लोकांना ज्यांचा अभिमान आहे अशा सर्व गोष्टी तो जमा करील. लोकांनी घडविलेल्या सर्व सुंदर वस्तू परमेश्वर गोळा करील आणि दूर फेकून देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा टाकतो तसा तो तिच्यात झेपा टाकील; त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालवली तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून टाकील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे पोहणारे पोहण्यासाठी त्यांचे हात लांब करतात तसे ते त्यांचे हात त्यांच्यावर लांब करतील. त्यांच्या हातात चतुराई असतानाही परमेश्वर त्यांचा अभिमान उतरवून टाकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सर्व अभिमान, गर्व व सर्व दुराचार याचा नाश करून त्यांचा शेवट करील.