Isaiah 25:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शत्रू आरडाओरडा करून गोंगाट करतो. भयंकर शत्रू आव्हाने देतो. पण देवा तू त्यांचा बंदोबस्त करतोस. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळवंटातील झाडेझुडपे सुकून जमिनीवर गळून पडतात, त्याप्रमाणे तू शत्रूचा पराभव करून त्यांना तुझ्यापुढे गुडघे टेकायला लावतोस. ज्याप्रमाणे मोठे ढग उष्णतेचा ताप कमी करतात, त्याप्रमाणे तू भयंकर शत्रूच्या गर्जना थांबवतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्‍यांचे जयगीत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि वाळवंटातील उष्णतेसारखा. परदेश्यांची गर्जना तुम्ही शांत करता; जशी ढगाच्या सावलीने उष्णता कमी होते, तसे निर्दयी लोकांचे हर्षगीत शांत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील