Isaiah 26:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही. वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील: दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जनांवर कृपा केली तरी तो नीती शिकायचा नाही; सरळांच्या राज्यातदेखील तो अधर्म करील; परमेश्वराचे ऐश्वर्य त्याला दिसायचे नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते, तेव्हा ते धार्मिकता शिकत नाहीत. प्रामाणिकपणा असलेल्या देशामध्येही ते दुष्कृत्ये करीत राहतात आणि याहवेहच्या प्रतिष्ठेची ते पर्वा करीत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पापी मनुष्यावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच न्यायीपण शिकणार नाही. सरळपणाच्या भूमीत तो दुष्टतेनेच वागणार, आणि परमेश्वराचा महिमा पाहणार नाही.