Isaiah 27:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल? काय केले असता त्याची पापे नाहिशी होतील? पुढील गोष्टी घडून येतील: वेदीतील चिऱ्यांचा चुरा केला जाईल. पूजेसाठी घडविलेल्या खोट्या देवांच्या मूर्ती व बांधलेल्या वेदी या सर्व नष्ट केल्या जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे चुनखडीसारखे चूर्ण करतील. अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या तशाच उभ्या सोडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे. तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल, आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत.