Isaiah 28:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांना देवाचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. एक हुकूम इकडे, एक हुकूम तिकडे, एक नियम इकडे, एक नियम तिकडे, एक धडा इकडे; एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल: नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.