Isaiah 28:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही त्या गोष्टीविरूध्द लढू नका. लढलात तर तुमच्या भोवतीची फास अधिक आवळला जाईल. मी ऐकलेल्या शब्दांत फरक होणार नाही. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या, पृथ्वीच्या नियंत्याच्या, तोंडचे हे शब्द आहेत म्हणून त्या गोष्टी घडून येतीलच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता हेटाळणी करू नका, नाहीतर तुमच्या बेड्या जास्त आवळतील; कारण सर्व भूमीवर निश्चयाने येणारा जो भयंकर नाश त्याविषयी प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून मी ऐकले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तुमचे थट्टा करणे थांबवा, नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे, संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता तुम्ही थट्टा करू नका, नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील. कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव, मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे.