Isaiah 28:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो जमिनीची मशागत करतो आणि मग पेरणी करतो. तो निरनिराळ्या बियांची पेरणी निरनिराळ्या तऱ्हेने करतो. तो बडिशेप विखरून टाकतो, जिरे शेतात फेकतो तर गहू ओळीत पेरतो. तो सातू विशिष्ट जागेत पेरतो तर शेताच्याकडेला काठ्या गहू पेरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जमीन सारखी केल्यावर तिच्यात तो काळे जिरे टाकतो, जिरे विखरतो, गहू रांगेने व जव नेमल्या जागी पेरतो व कडेला काठ्या गहू पेरतो की नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो, तो गहू रांगेत आणि जव नेमलेल्या ठिकाणी आणि त्याच्या काठाला काठ्या गहू पेरीत नाही काय?