Isaiah 28:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोठ्या दातेरी फळीने शेतकरी बडिशेप मळतो का? नाही. मोहरी मळण्यासाठी शेतकरी त्यावरून गाडीचे चाक फिरवितो का? नाही. शेतकरी बडिशेप व मोहरी मळण्यासाठी लहान काठी वापरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे तो काळ्या जिर्‍यांची मळणी तीक्ष्ण धारेच्या यंत्राने करीत नाही व जिर्‍यावर गाडीचे चाक फिरवत नाही, तर काळे जिरे काठीने व जिरे दांड्याने झोडपतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही, किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही; शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो, आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही, पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात.