Isaiah 3:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वडीलधारी मंडळी व नेते यांनी केलेल्या कृत्यांविरूध्द परमेश्वर न्याय देईल. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोकांनी द्राक्षांची बाग(यहुदा) जाळली आहे. तुम्ही गरिबांच्या वस्तू बळकावल्या व स्वत:च्या घरात भरल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील: “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.