Isaiah 3:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर असेही म्हणतो: सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.