Isaiah 30:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” आणि संदेष्ट्यांना म्हणतात, “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.