Isaiah 30:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे; त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणार्या अग्नीसारखी आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.