Isaiah 30:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचा श्वास (आत्मा), पाणी वाढत जाऊन गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करील. हा न्याय कसा असेल? तर ‘नाशाच्या चाळणीतून’ राष्ट्रांना चाळून काढल्याप्रमाणे तो असेल. जसे लगाम घालून जनावरांना ताब्यात ठेवले जाते तसे लोकांना लगाम घालून परमेश्वर नियंत्रणात ठेवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा श्वास दुथडी भरून वाहणार्‍या व गळ्यापर्यंत पोहचणार्‍या प्रवाहासारखा आहे, तो राष्ट्रांना नाशरूप चाळणीने चाळतो; भ्रांतिमूलक लगाम लोकांच्या जाभाडात आला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे, तो गळ्यापर्यंत वर येतो. ते नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना हादरवितात; ते लोकांच्या जबड्यात लगामाचा भाग ठेवतात जो त्यांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.