Isaiah 30:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळेला तुम्ही आनंदगीते गाल. सुटीच्या दिवसातील रात्रीप्रमाणे हा काळ असेल. परमेश्वराच्या डोंगरावर जाताना तुम्हाला आनंद वाटतो, इस्राएलच्या खडकाकडे जाताना (परमेश्वराच्या उपासनेला जाताना) बासरीचा स्वर ऐकून तुम्हाला हर्ष होतो, तसाच हा आनंद असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सण पाळताना जसा रात्री गायनाचा नाद उठतो तसा तुमच्या गायनाचा नाद उठेल; परमेश्वराच्या पर्वताकडे, इस्राएलाच्या दुर्गाकडे बासरी वाजवत समारंभाने जाणार्‍याप्रमाणे तुमच्या मनास उल्लास प्राप्त होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तुम्ही जसे रात्रीच्या वेळेस पवित्र सण साजरा करता त्याप्रमाणे तुम्ही गाणी गाल; जेव्हा लोक बासरी वाजवित याहवेहच्या पर्वताकडे वर इस्राएलच्या खडकाकडे जातात, तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते. आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल.