Isaiah 30:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो.