Isaiah 30:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नेगेवमधल्या प्राण्यांविषयी शोक संदेश: नेगेव ही धोकादायक जागा आहे. ही भूमी सिंह, फुरसे व उडणारे साप ह्यांनी व्यापलेली आहे. पण काही लोक नेगेवमधूनच प्रवास करीत आहेत. ते मिसरला जात आहेत. त्यांनी आपली धन संपत्ती गाढवांवर व उटांवर लादली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मदत न करू शकणाऱ्या राष्ट्रांवर ते विसंबले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी: ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, सिंह आणि सिंहीण, फुरसे आणि उडणारे साप, दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.