Isaiah 31:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिसरमधील लोक फक्त माणसे आहेत देव नाहीत. मिसरमधील घोडे फक्त प्राणी आहेत पण आत्मे नाहीत. परमेश्वर स्वत:चा हात लांब करील आणि मदतनीसाचा (मिसरचा) पराभव होईल. त्याची मदत घेणारे लोक (यहुदा) पडतील. त्या सर्व लोकांचा बरोबरच नाश केला जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा जे मदत करणारे ते अडखळतील, ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. सर्वजण एकत्र नाश पावतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिसर मनुष्य आहे देव नाही, त्यांचे घोडे मांस आहेत आत्मा नाही. जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल आणि ज्याची मदत केली तो पडेल; दोघांचा नाश होईल.