Isaiah 31:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या ईशान्येकडील एकेकाळी शक्तिशाली असलेले हे (अश्शूर) राष्ट्र तलवारीच्या बळावर पराभूत होईल. पण ही तलवार मानवाची नसेल. अश्शूरचा नाश होईल. पण हा नाश मानवाच्या तलवारीने होणार नाही. देवाच्या तलवारीमुळे अश्शूर पळून जाईल. पण त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही; एक तलवार, जी मर्त्य मानवांची नाही, ती त्यांना गिळून टाकेल. तलवार पाहून ते पळून जातील आणि त्यांच्या तरुणांना जबरदस्तीने मजुरीच्या कामाला ठेवले जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूर तलवारीने पडेल; जी त्याचा नाश करील ती सत्ताधारी मनुष्याची तलवार नव्हे. तो तलवारीपासून पळून जाईल आणि त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.