Isaiah 32:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाव्यास तेथे जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण महाल सोडून दिले जातील, गर्दीची शहरे ओस पडतील; टेकडी व टेहळणीचा बुरूज सर्वकाळपर्यंत गुहा होईल, रान गाढवांचा आनंद, कळपांची कुरणे होतील.