Isaiah 33:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाहा! तुम्ही युध्द करता आणि दुसऱ्यांच्या वस्तू चोरता. पण त्यांनी तुमचे काहीही चोरले नाही. तुम्ही दुसऱ्यांविरूध्द उठता पण त्यांनी तुमच्याविरूध्द कधीच उठाव केला नाही. म्हणून जेव्हा तुम्ही चोरी करायचे थांबवाल तेव्हा ते तुमच्या वस्तू चोरतील. तुम्ही लोकांविरूध्द उठाव करायचे सोडाल तेव्हा ते तुमच्याविरूध्द उठाव करतील. मग तुम्ही म्हणाल:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरे लुटार्या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे विनाशका, तुझा धिक्कार असो, तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही! हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो, तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही! जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल, तेव्हा तुमचा नाश होईल; जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल, तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही! अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो! जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील, जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील.