Isaiah 33:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हो! पैशासाठी दुसऱ्यांना जे त्रास देत नाहीत असे प्रामाणिक लोक या अग्नीमधूनही वाचतील. ते लोक लाच घेत नाहीत. दुसऱ्याची हत्या करण्याच्या बेताला ते नकार देतात. दुष्कृत्यांच्या योजनांकडे ते पाहण्याचे टाळतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो; जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही व दुष्कृत्याकडे पाहत नाही.