Isaiah 34:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या पाटीकडे पाहा. त्यावर लिहिलेले वाचा त्यातून काहीही सुटलेले नाही. ते प्राणी सर्व एकत्र येतील असेच त्यावर लिहिले आहे. ‘मी त्यांना एकत्र आणीन. असे देव म्हणाला म्हणून देवाचा आत्मा त्यांना एकत्र करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा; ह्या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही; कोणी जोडप्यावाचून असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्याच्या श्वासाने त्यांना एकत्र केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा: यामधील कोणाचाही अभाव होणार नाही, एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही. कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे, आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.