Isaiah 34:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाशातील सर्व तारे विरघळून जातील आणि आकाशे चर्मपत्राच्या गुंडाळीसारखे गुंडाळले जातील; द्राक्षवेलावरील कोमेजलेल्या पानांप्रमाणे, अंजिराच्या झाडावरील सुकून गेलेल्या अंजिरांप्रमाणे सर्व तारांगण गळून पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील, जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो.