Isaiah 34:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवारमाखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्तानेभरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाशकरण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराची तलवार रक्ताने भरली आहे. मांद्याने, कोकरांच्या व बकर्‍यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे; कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, ती चरबीने झाकलेली आहे— कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.