Isaiah 35:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घाबर्या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.