Isaiah 36:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण सेनापती म्हणाला “माझ्या स्वामीने, मला, ह्या गोष्टी, फक्त तुम्हाला किंवा तुमच्या हिज्कीया राजालाच सांगण्यासाठी पाठविलेले नाही. कोटाच्या भिंतींवर बसलेल्या लोकांनाही हे सांगण्यासाठी मला माझ्या राजाने पाठविले आहे. त्या लोकांनाही पुरेसे अन्न वा पाणी मिळणार नाही. त्यांनाही तुमच्याप्रमाणेच स्वत:ची विष्ठा खावी लागेल व स्वत:चे मूत्र प्यावे लागेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगायला पाठवले होते, ते काय फक्त तुझ्या धन्याला आणि तुला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुझ्यासारखेच त्यांची स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?”