Isaiah 36:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिज्कीयाचे हे म्हणणे ऐकू नका. अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका. अश्शूरचा राजा म्हणतो, “आपण एक करार करू तुम्ही शहराबाहेर माझ्याकडे यावे. नंतर प्रत्येकाला घरी जाण्यास मोकळीक मिळेल. प्रत्येकाला आपापल्या द्राक्षवेलींची द्राक्षे व आपापल्या अंजिराच्या झाडाची अंजिरे खाण्यास मुभा मिळे. प्रत्येकाला स्वत:च्या विहिरीचे पाणी पिता येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या, आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षीचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा व तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे महराज असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या टाकीतले पाणी प्या.