Isaiah 36:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले. सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला. त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते. परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आणणाऱ्या चराजवळ होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखीशाहून रब-शाके1 ह्याला मोठ्या सैन्यानिशी हिज्कीया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो परटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अश्शूरच्या राजाने आपल्या मोठ्या सैन्यासह सरसेनापतीला लाखीशहून हिज्कीयाह राजाकडे यरुशलेमला पाठविले. जेव्हा सेनापती वरच्या हौदाच्या पाटाजवळ रस्त्याच्या कडेला थांबला
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर अश्शूरच्या राजाने रब-शाके याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखीशाहून यरूशलेमेमध्ये हिज्कीया राजाकडे पाठवले, तो वरच्या तळ्याच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोहचला, आणि उभा राहीला.