Isaiah 36:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या सामर्थ्यापासून एखाद्या राष्ट्रातील लोकांना वाचविले आहे अशा एका तरी देवाचे नाव मला सांगा. मी त्या सर्वांचा पराभव केला. म्हणूनच म्हणतो की परमेश्वर माझ्या सामर्थ्यापासून यरूशलेमला वाचवू शकणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्यांच्या देशांना माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम सोडवील काय?