Isaiah 36:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर राजाचा कारभारी (हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम) राजाचा चिटणीस (शेबना) व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा (आसाफचा मुलगा यवाह) ह्यांनी आपले कपडे फाडले, (ह्याचा अर्थ त्यांना फार दु:ख झाले होते.) ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.