Isaiah 37:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा माझे म्हणणे ऐक डोळे उघड आणि सन्हेरिबकडून आलेला संदेश पाहा. सन्हेरिबने मला हा संदेश पाठविला, त्यात जिवंत देवाची म्हणजेच तुझी निंदानालस्ती केली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा; आणि तुझा, सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सन्हेरीबाने निरोप पाठवला आहे. त्याचे सर्व शब्द ऐक.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, कान लाव व ऐक! हे परमेश्वरा तुझे डोळे उघड आणि पाहा, आणि सन्हेरीबाचे शब्द ऐक, जी त्याने जिवंत देवाची निंदा करण्यासाठी पाठवली आहेत.