Isaiah 37:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते. ते घाबरलेले व खजील झालेले होते. शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते. घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते. ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील गरम झळांनी जळून जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवळ, हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, कोवळे शेत ह्यांसारखे ते झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, ते निराश व लज्जित झालेले आहेत. ते शेतातील पिकासारखे, कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, छतावर उगविलेल्या गवतासारखे, पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यामध्ये राहणारे, अल्प शक्तीचे होते, ते मोडून गेले व फजीत झाले. ते शेतात लावलेल्या रोपासारखे, हिरवे गवत, छतावरचे किंवा शेतातले गवत, वाढ होण्यापूर्वी पूर्वेच्या वाऱ्यापुढे करपले आहे.